टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला पितृशोक, पियूष चावलाच्या वडिलांचे कोरोनाने निधन

By India.com Staff Last Published on - May 10, 2021 6:27 PM IST

मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले आहे. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयूष चावला (Piyush Chawla) याचे वडील प्रमोद चावला यांचे कोरोनामुळे (Covid-19) निधन झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तब्येत खालवल्यामुळे त्यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी त्यांचे निधन (Piyush Chawla father death) झाले आहे. पियूष चावलाने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

Powered By 

 

View this post on Instagram

 

A post shared by Piyush Chawla (@piyushchawla_official_)

पीयुष चावलाने इन्स्टाग्रामवर वडिलांचा फोटो पोस्ट करत त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये पियूष चावलाने भावूक होत असे म्हटले आहे की, ‘आज माझ्यामागे पाठीशी उभा राहणारा मजबूत स्तंभ ढासळला आहे. आता त्यांच्याशिवाय हे जीवन पहिल्यासारखे नसणार आहे.’

पियुष चावलाच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमने ट्विट करत त्याच्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजीने ट्विट करत असे म्हटले आहे की, ‘आम्ही या कठीण प्रसगी तुझ्या कुटुंबासोबत आहोत. तू खंबीर राहा.’ तसंच क्रिकेटर इरफान पठाणने (irfan Pathan) देखील ट्विट करत पियुष चावलाच्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे.

दरम्यान, रविवारी आयपीएलमधील (IPL) राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) संघाचा वेगवान युवा गोलंदाज चेतन साकरियाचे (Chetan Sakariya) वडील कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या निधनाची माहिती दिली होती.