×

Harbhajan Singh ने घेतला मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला म्हटले अलविदा

सर्व चांगल्या गोष्टींचा कधी तरी शेवट होत असतो. आज मी अशा खेळाचा निरोप घेतोय, त्याने मला आयुष्यात सर्व काही दिले.

user-circle cricketcountry.com Written by India.com Staff
Published: Dec 24, 2021, 03:50 PM (IST)
Edited: Dec 24, 2021, 03:50 PM (IST)

मुंबई: टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने शुक्रवारी मोठी घोषणा केली. ती म्हणजे त्याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) संन्‍यास घेतला आहे. हरभजन अर्थात भज्जीने ट्वीट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. हरभजन सिंगने 1998 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सन 2016 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये ढाकाच्या शेर ए बंगाल स्‍टेडियमवर भज्जीने त्याच्या करिअरमधील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टीम इंडियाविरुद्ध यूएई अशी ही लढत झाली होती. आता 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर भज्जीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 मध्ये झालेल्या टेस्ट सीरिज टीम इंडियाने जिंकली होती. या विजयात हरभजनचा सिंहाचा वाटा होता. तसेच 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वन-डे वर्ल्डकप दरम्यानही हरभजन टीमचा सदस्य होता.

ट्वीटमध्ये काय म्हणाला हरभजन?

‘सर्व चांगल्या गोष्टींचा कधी तरी शेवट होत असतो. आज मी अशा खेळाचा निरोप घेतोय, त्याने मला आयुष्यात सर्व काही दिले. मी त्या प्रत्येकाचा आभारी आहे, ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला. सगळ्याचे मन:पूर्वक आभार..’, असे सांगत हरभजन सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टीम इंडियात एक महान फिरकीपटू गोलंदाज म्हणून हरभजनची ओळख आहे. हरभजनने 103 टेस्टमध्ये 415 विकेट्स घेतल्या आहेत. तर वन-डे क्रिकेटमध्ये 269 आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये 25 विकेट्सची त्याच्या नावावर नोंद आहे. त्याचबरोबर हरभजनची आयपीएलमध्ये ही कारकिर्द जबरदस्त ठरली. तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल विजेत्या टीमचा सदस्य होता. याआयपीएलमध्ये (IPL 2021) तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात दिसला. हरभजनने आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेतल्या आहेत.

आता ‘या’ भूमिकेत दिसू शकतो भज्जी!

TRENDING NOW

भज्जीला आयपीएलच्या अनेक फ्रँचायझींमध्ये सहभागी होण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. तो आता यापैकी एकासोबत दिसण्याची शक्यता आहे. परंतु हरभजनने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘पीटीआय’ला (PTI) सांगितले की, ‘भज्जीची आयपीएलच्या एका फ्रँचायझीच्या संपर्कात आहे. तो सल्लागार, मार्गदर्शक किंवा सल्लागार गटाचा भाग असू शकते. लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रँचायझीला भज्जीच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.